Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची केली घोषणा

हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली 
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची केली घोषणा



इंदापुर : खरा पंचनामा

महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा समावेश झाल्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरची जागा भाजपला सुटणार नसल्याचे लक्षात येताच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.

काल शरद पवार यांना मुंबईत भेटल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्ता मेळावा घेण्याची घोषणा करत थेट इंदापूर गाठले होते. त्यानंतर आज त्यांनी कार्यकर्त्यांसमोर आपल्या भावना व्यक्त करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.

इंदापुरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, "आपण दोन गोष्टींसाठी आज जमलो आहे. गेल्या दोन महिन्यांपासून आपण मतदारसंघात फिरतोय. फिरताना जनतेचा एकाच गोष्टीवर जोर आहे ते म्हणजे कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढवायची."

ते पुढे म्हणाले, काल पवार साहेबांनी मला सिल्वर ओकला बोलवले आणि सांगितले की, "हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातील लोकांची मागणी आहे की, तुम्हाला उमेदवारी द्यावी. आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की तुम्ही पुढे काय करायचे."

"यावेळी पवार साहेबांनी मला त्यांच्या पक्षाच्या संदर्भातील काही गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर मी सुद्धा माझ्याबाबत आणि कार्यकर्त्यांबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत."

दरम्यान हर्षवर्धन पाटील यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे पुत्र आणि कन्येने व्हाट्सअप स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवले होते. त्यामुळे पाटील लवकरच पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झाले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.