Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कवठेमहांकाळ तालुक्यात घरफोड्या करणाऱ्याला अटक अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई

कवठेमहांकाळ तालुक्यात घरफोड्या करणाऱ्याला अटक
अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

कवठेमहांकाळ तालुक्यात घरफोड्या करणाऱ्या सांगलीतील तरूणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून चोरीचे अडीच लाख रूपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

विनायक बजरंग खुटाळे (वय ३०, रा. संजयनगर, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शनिवारी नागज येथील खोत वस्ती परिसरात राहणारे नंदाबाई खोत यांनी घरात चोरी झाल्याची तक्रार कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिली होती. यातील संशयितांना शोधण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना एक तरूण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील गुजराती हायस्कूल ते ट्रक अड्डा रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने या परिसरात सापळा रचला होता. त्यावेळी विनायक खुटाळे संशयास्पदरित्या तेथे फिरताना आढळला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या पॅंटच्या खिशात दागिने आढळून आले. त्याबाबत कसून चौकशी केल्यानंतर त्याने नागज फाटा येथे दिवसा एक घर फोडून तेथून दागिने चोरल्याची कबुली दिली. त्याला अटक करून त्याच्याकडील अडीच लाखांचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक पंकज पवार, सचिन धोत्रे, अरूण पाटील, सोमनाथ गुंडे, सुनिल जाधव, अभिजित ठाणेकर, रोहन गस्ते, अभिजित माळकर, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.