Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार

राज्यातील पाच विधानसभा अन् तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार



नवी दिल्ली : खरा पंचनामा

राज्यातील 5 विधानसभा मतदारसंघाची नावं बदलणार असल्याचे समजते. राज्यातील तीन लोकसभा मतदारसंघाची नावे बदलणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. मतदारपूर्नरचनेनंतर केंद्रीय निवडणूक आयोग या मतदारसंघाची नावे बदलणार आहे.

संभाजीनगर जिन्ह्यातील नऊपैकी तीन विधानसभा मतदारसंघांच्या नावामध्ये बदल होणार आहे. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पश्चिम, औरंगाबाद पूर्व या मतदारसंघाची नावे बदणार आहे. डिलिमिटेशननंतर ही नावे बदलण्यात येणार आहेत.

अहमदनगरशहर विधानसभा मतदारसंघाचे अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ असे नाव होणार आहे. उस्मानाबाद मतदारसंघाचे नाव धाराशिव विधानसभा मतदारसंघ असे होणार आहे. त्याचप्रमाणे लोकसभेच्या तीन मतदारसंघाची नावे देखील बदलली जाणार आहेत. अहमदनगरचे अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपत्री संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव लोकसभा मतदारसंघ असे नामकरण होणार आहे.

मतदारसंघांच्या नावात बदल करण्याचा अधिकार हा फक्त मतदारसंघ पुनर्रचना आयोगाला (डिलिमिटेशन कमिशन) असतो. डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ पुनर्रचनेनंतरच निवडणूक आयोग मतदारसंघांची नावे बदलणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारनोंदणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10 हजार मतदारांची नोंदणी झाल्याचा मुद्दा काही राजकीय पक्षांनी उपस्थित केला आहे, याबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्टीकरण केले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर 2024 मसुदा मतदार यादी 6 ऑगस्ट 2024 रोजी दुसऱ्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रकाशित केली आहे. वेळापत्रकानुसार दावे आणि हरकती सादर करण्यासाठी 14 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. दावे आणि हरकतींचा योग्य विचार केल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.