बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
पुणे : खरा पंचनामा
गेल्या आठवड्यात बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी मात्र फरार होते. त्यांना शोधण्याचं काम पोलिसांकडून सुरु होते. अखेर या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील दोघांना नागपूर तर एकाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून फरार असलेल्या आरोपींबाबत पुणे पोलिसांना काही धागेदोरे हाती लागले होते. त्याद्वारे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका तरुणाला ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळत आहे. ही घटना घडली त्या रात्री येवलेवाडी परिसरातील एका दारूच्या दुकानातून दारू खरेदी करताना 3 संशयित तरुण सीसीटिव्हीमध्ये कैद झाल्याचे आढळून आले. या सीसीटिव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र, पुणे पोलिसांनी याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा
केलेली नाही. दुपारपर्यंत या संपूर्ण घटनेच्या संदर्भात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ही घटना घडल्यापासून पुणे पोलिसांची 60 पथके हे आरोपींच्या मागावर होती. परंतू, तरीही आरोपींचा शोध लागत नव्हता. मात्र आता आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.