Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या साताऱ्यातील गुन्हेगाराला अटक येवलेवाडी फाटा येथे सांगली एलसीबीची कारवाई

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या साताऱ्यातील गुन्हेगाराला अटक
येवलेवाडी फाटा येथे सांगली एलसीबीची कारवाई 



सांगली : खरा पंचनामा

कडेगाव तालुक्यातील चिंचणीजवळील येवलेवाडी फाटा येथे बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तूल, काडतूस असा ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली. 

विशाल सूर्याजी माने (वय २८, रा. मासुर्णे, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैधरित्या शस्त्रे बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक पथक तयार केले होते. पथक शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेत असताना येवलेवाडी फाट्याजवळील टोल नाक्यावर विशाल माने देशी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. 

पथकाने त्या परिसरात सापळा रचून माने याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल तसेच खिशात काडतूस आढळले. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसतानाही त्याने ते बाळगल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले तसेच त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात चिंचणी वांगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एलसीबीचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सतिश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, संजय पाटील, सूर्यकांत साळुंखे, हणमंत लोहार, सुनिल जाधव, सूरज थोरात, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.