Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर

राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर



मुंबई : खरा पंचनामा

राजधानी मुंबईत आपलं स्वतःचं घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईतील या घरासासाठी राज्यातील आमदार-खासदार व इतर लोकप्रतिनिधीही इच्छुक असतात. त्यामुळेच, म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकप्रतिनिधींसाठीही घराची आरक्षित सोडत असते.

गेल्या महिन्यात म्हाडाकडून 2030 घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता, या लॉटरीची सोडत आज निघाली असून 2030 जणांचं मुंबईतील स्वप्नाचं घर आता सत्यात उतरलं आहे. त्यामध्ये, अनेक मराठी कलाकारांना घर लागलं असून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनाही म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं आहे. या सोडतीसाठी 1 लाख 13 हजार जणांनी अर्ज केला होता. मात्र, या अर्जदारांपैकी फक्त 2030 भाग्यवंतांना हे घर मिळाले आहे. उर्वरित अर्जदारांची निराशा झाली आहे. पण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी घराचे स्वप्न बघणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच आणखी एक लॉटरी आणणार आहोत, असे सावे यांनी जाहीर केले आहे.

मुंबईमध्ये स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. महाराष्ट्रात 1977 साली म्हाडाची स्थापना झाली. तेव्हापासून म्हाडाने सर्वांसाठी घरं बांधली. म्हाडाने आतापर्यंत साडे सात लाख घरं वाटली आहेत. त्यातील अडीच लाख घरं मुंबईतच दिलेली आहेत. प्रत्येकाला आपलं घर मिळावं हाच यामागचा उद्देश आहे. आजच्या लॉटरीसाठी एक लाख तेरा हजार अर्ज आले होते. त्यापैकी, 2030 जणांना म्हाडाच्या लॉटरीत नशिबाने घर मिळालं आहे. राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून या घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्या कोट्यातून त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना म्हाडाची लॉटरी जाहीर होण्यापूर्वीच त्यांचे घर निश्चित झालं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.