Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बोपदेव घाटातील बलात्काऱ्यांचा दिसताक्षणी एन्काऊंटर? पोलिसांकडून जोरदार तयारी; कारवाईबाबत गुप्तता

बोपदेव घाटातील बलात्काऱ्यांचा दिसताक्षणी एन्काऊंटर? 
पोलिसांकडून जोरदार तयारी; कारवाईबाबत गुप्तता



पुणे : खरा पंचनामा

मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची ओळख पटल्यानंतर दिसताक्षणी एन्काऊंटर करण्याच्या 5 तयारीत पुणे पोलीस असल्याची माहिती अतिवरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

गुन्हे शाखेची पथके आरोपींच्या मागावर असून, सीसीटीव्ही आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) माध्यमातून संबंधित आरोपींची कुंडली मिळविण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, एन्काऊंटर करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक सराव करीत असून, त्याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे.

घाटमाथा परिसरात मुलीवर अत्याचार करणाऱ्या तिघा आरोपींच्या शोधार्थ गुन्हे शाखा, कोंढवा, वानवडी, हडपसर, लोणी काळभोर पोलिसांची पथके दिवस-रात्र काम करीत आहेत. त्याद्वारे स्थानिक नागरिकांच्या माहितीसह आजूबाजूच्या सीसीसीटीव्ही फुटेजनुसार पोलिसांनी संबंधित आरोपींची कुंडली मिळविली आहे. त्यानुसार त्यांच्या कुटुंबीयांना ताब्यात घेऊन विचारपूस केली जात आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी संबंधितांना 'ट्रॅक' केले असून, लवकरच त्यांना ताब्यात घेतले जाणार आहे.

मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींनी केलेला प्रवास, बोपदेव घाट ते सासवड, कोंढवा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा डेटा धुंडळला आहे. त्याद्वारे पोलिसांनी आरोपींच्या गुन्ह्याची कडी जुळविली असून, संबंधित आरोपींची ओळख पटल्याक्षणी त्यांच्या एन्काऊंटरची तयारी पुणे पोलिसांनी केली आहे. त्यासाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली असून, पथकाकडून एन्काऊंटरच्या प्रात्यक्षिकाची तयारी केली जात आहे. दरम्यान, आरोपींच्या अटकेच्या मागणीसह पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुणेकरांसह विविध सामाजिक संघटनांनी मागणी केली आहे. त्या दृष्टीने पोलिसांकडून आता थेट एन्काऊंटरची तयारी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

बोपदेव घाटात महाविद्यालयीन तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात (एआय) वापर केला आहे. तसेच आरोपींची अधिकची माहिती देणाऱ्यास पुणे पोलिसांकडून १० लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी परिसरातील तब्बल तीन हजार मोबाईल संवादाचा डेटा संकलित केला आहे. त्यांचे नाव, पत्त्यानुसार माहितीचे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू केले आहे. तसेच अडीचशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.