कराडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांची बदली रद्द
कराड : खरा पंचनामा
कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांची तीन दिवसांपूर्वी रात्रीत झालेली तडकाफडकी बदली जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून करण्यात आली होती. या बदली प्रकरणी मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजेच मॅट न्यायालयाने काल एक महत्वपूर्ण निर्णय दिला असून त्याच्या निर्णयानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन पाटील याची करण्यात आलेली बदली रद्द ठरवली आहे. पोलिस निरीक्षक पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदली निर्णयाच्या विरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती. त्याचा काल रात्री निकाल झाला.
कराड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या जागी राजू ताशीलदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तीन दिवसांपूर्वी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही झाली आहे.
तब्बल वर्षभरापूर्वी येथील शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदावर के. एन. पाटील झाली होती. पदभार स्वीकारून केवळ आठ महिन्यांचा कालावधी होतो ना होतो तोच त्यांची परवा रात्री बदली झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांची तडकाफडकी बदलीचे आदेश देण्यात आले होते. श्री. पाटील यांची प्रशासकीय कारणास्तव बदली झाल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले होते. ती बदली तात्पुरत्या स्वरूपाची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
पोलिस अधीक्षक शेख यांनीही पोलिस निरीक्षक पाटील यांची झालेली बदली तांत्रिक कारणाने आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या काही महत्त्वाच्या नियमानुसार झाली आहे. त्याचे कारण स्पष्ट करतायेणार नाही, असे स्पष्ट केले होते. पोलिस निरीक्षक पाटील यांनी त्या आदेशाच्या विरोधात मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण म्हणजेच मॅट न्यायलयात धाव घेतली होती. तेथे त्यांच्या खटल्याचा दोन दिवसांत निकाल झाला. त्यात त्यांची तडकाफडकी बदली रद्द करण्यात आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.