Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राष्ट्रवादीत मोठा भूकंप ! भुजबळांचा राजीनामा घ्या, अजित पवारांच्या तटकरेंना सूचना

राष्ट्रवादीत मोठा भूकंप ! भुजबळांचा राजीनामा घ्या, अजित पवारांच्या तटकरेंना सूचना



मुंबई : खरा पंचनामा

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे भाजपा वगळता इतर पक्षांनी उमेदवार यादी जाहीर केली नसल्याने उत्सुकता शिगेला असताना, दुसरीकडे नाराज असणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

यामुळेच अनेकजण पक्षांतर करण्याच्या तयारीत असताना यामध्ये समीर भुजबळ यांचाही समावेश आहे. समीर भुजबळ महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतून मोठी घडामोड समोर येत आहे. अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यातच आता राष्ट्रवादीतून मोठी घडामोड समोर येत आहे. अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना समीर भुजबळांचा राजीनामा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

अजित पवार यांनी सुनील तटकरे यांना समीर भुजबळ यांचा राजीनामा घेण्याची सूचना केली आहे. अजित पवारांनी समीर भुजबळ यांना मुंबई अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या सूचना केल्या असल्याची सूत्रांची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्याला पुन्हा एकदा काका- पुतण्यातील संघर्ष पाहायला मिळू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना त्यांचे पुतणे समीर भुजबळ मोठा धक्का देऊ शकतात, अशी शक्यता आहे. समीर भुजबळ यांनी आधीच आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं आहे. पण महायुतीकडून संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याचं समजत आहे.

समीर भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीत ही जागा शिंदे गटाकडे आहे. त्यामुळे शिंदे गट ही जागा भुजबळांसाठी सोडण्याची शक्यता कमीच आहेत. अशा स्थितीत समीर भुजबळांसमोर अपक्ष लढण्याचा किंवा महाविकास आघाडीत प्रवेश करणं हे दोन पर्याय आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.