Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर

अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार, प्रकृती गंभीर



मुंबई : खरा पंचनामा

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती आहे. त्यांचे पुत्र आमदार झिशान सिद्धिकी यांच्या कार्यालयाबाहेर तीन अज्ञातांनी सिद्धिकी यांच्यावर गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या गोळीबारात सिद्धिकी यांना गंभीर दुखापत झालेली आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बाबा सिद्धिकी यांनी कित्येक वर्षे काँग्रेसमध्ये काम केले. काँग्रेसचे एकेकाळचे ते बडे नेते राहिले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मुंबई विभागाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आज शनिवारी सायंकाळी दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्धिकी हे त्यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयासमोर थांबलेले असताना त्यांच्यावर तीन राऊंड फायर करण्यात आले. वांद्रे पूर्व येथे ही गोळीबाराची घटना झाली.

सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करुन अज्ञात मारेकरी वेगात पळून गेले. सिद्धिकी यांच्या छातीवर एक गोळी लागल्याने सिद्धिकी रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. निर्मल नगर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.