सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हा संदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. या सुनावणी आधीच मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड बदलण्यात आला आहे. अचानक रात्रीत बदलण्यात आलेल्या बोर्डमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाने दाखल केलेल्या सुनावणी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाला 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह वापरण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या सुनावणी आधीच अजित पवार गटाने कार्यालयाबाहेरील बोर्ड बदलला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई येथील कार्यालयाबाहेरील बोर्ड अचानक बदलण्यात आला आहे. या बोर्डवरती घड्याळाचे चिन्ह आहे, खाली 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-महाराष्ट्र प्रदेश' असं नाव देण्यात आले आहे. या नावाच्या खाली 'भारतीय निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'घड्याळ' हे चिन्ह दिले आहे. हे प्रकरण सध्या माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर न्यायप्रविष्ठ आहे. अंतरिम आदेशानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आगामी सर्व निवडणुकांसाठी 'घड्याळ' हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे'., असं स्पष्ट नमुद केले आहे.
न्यायालयाने दिलेल्या सूचनांचे पालन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केले नसल्याची तक्रार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती. यानंतर आता मोठा बदल करण्यात आला आहे.
आज सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे. या सुनावणी आधीच बोर्डमध्ये बदल करण्यात आला आहे. रात्रीच अचानक नवीन बोर्ड लावण्यात आला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. आज होणाऱ्या सुनावणीत काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.