Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री, हाती घेणार धनुष्यबाण?

समीर वानखेडेंची राजकारणात एन्ट्री, हाती घेणार धनुष्यबाण?



मुंबई : खरा पंचनामा

IRS समीर वानखेडे राजकणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून ते निवडणूक लढवण्यास उत्सुक आहेत.

राज्याच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याने सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. यातच इच्छुकांची संख्याही मोठी आहे. यातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे IRS समीर वानखेडे विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

गेल्या काही वर्षांत समीर वानखेडे खुप चर्चेत आले आहेत. अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात वानखेडेंनी अटक केली होती. यानंतर ते प्रकाशझोतात आले होते.

समीर वानखेडे महायुतीकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून त्यांची चाचपणी सुरू केली असल्याचे म्हटले जात आहे. धारावी मतदार संघातून ते निवडणूक लढवू शकतात असे म्हटले जात आहे. काँग्रेस माजी मंत्री खासदार वर्षा गायकवाड यांचा हा मतदार संघ आहे. हा मतदार संघ आरक्षित मतदार संघ आहे.

समीर वानखेडे मुळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भरुणतोफा या गावचे आहेत. त्यांचे वडील राज्य सरकारच्या अबकारी विभागात काम करत असत. समीर वानखेडेंचे शिक्षण मुंबईतून झाले. त्यांचे वडील 1970 मध्ये मुंबईत आले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.