Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जप्त करण्यास सुरूवात राज्यातून २३ हजार ९७८ शस्त्रे जमा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक शस्त्रे जप्त करण्यास सुरूवात
राज्यातून २३ हजार ९७८ शस्त्रे जमा



मुंबई : खरा पंचनामा

निवडणुकीत कुठलेही गालबोट लागू नये यासाठी परवानाधारक शस्त्रे ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. १५ ऑक्टोबर ते आतापर्यंत राज्यभरातून २३ हजार ९७९ शस्त्रे जमा करण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी राज्य निवडणूक आयोग, पोलिसांसह संबंधित यंत्रणा अॅलर्ट मोडवर आहेत. राज्यात आचारसंहिता लागू होताच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येत असून पोस्टर्स बॅनर्स हटवण्याची कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे राज्यात परवानाधारक शस्त्र जमा करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. त्याबाबत ही कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

राजकारणी असो की, मोठे व्यावसायिक याशिवाय विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांच्याकडून स्वरक्षणासाठी शस्त्र परवाना काढला जातो. हा शस्त्र परवाना जिल्हा प्रशासन व पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत गृह विभागाच्या परवानगीने दिले जातात. मात्र निवडणूक काळात परवानाधारकांना आचारसंहिता संपेपर्यंत शस्त्र जमा करावी लागतात. निवडणूक काळात राजकीय वादविवाद, वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे निवडणूक काळात कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परवानाधारकांना शस्त्र जमा करणे बंधनकारक आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील परवानाधारकांकडून शस्त्र जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काही अपवादात्मक बाब असल्यास परवानाधारक शस्त्र जमा करण्यात येत नसल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.