Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक

कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही
मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक



मुंबई : खरा पंचनामा 

पीएमएलए कायद्यांतर्गत चौकशीसाठी बोलविलेल्या व्यक्तीची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्याऐवजी कार्यालयीन वेळेतच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असे परिपत्रक ईडीने जारी केले आहे. लोकांना रात्री उशिरापर्यंत चौकशीसाठी थांबवून ठेवण्यात येत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने ईडीला चांगलेच फटकारले होते. त्यानंतर ईडीने हे परिपत्रक जारी केले.

ज्यांची चौकशी करण्यात येत आहे, त्यांना "झोपेचा अधिकार" आहे आणि त्यांच्या या अधिकाराचा आदर करा, असे न्यायालयाने म्हटले होते. ईडीने ११ ऑक्टोबरला जारी केलेले परिपत्रक केवळ विभागाअंतर्गतच जारी केले आहे. सार्वजनिक केलेले नाही, असे न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने म्हटले.

ईडी त्यांचे परिपत्रक संकेतस्थळावर अपलोड करेल आणि ट्विटरवरही अपलोड करेल, हे सांगण्याची आवश्यकता नाही, असे न्यायालयाने म्हटले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ईडीने केलेली अटक बेकायदा आहे, असे म्हणत व्यावसायिक राम इसरानी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. त्यांना चौकशीसाठी पूर्ण दिवस वाट पाहायला लावत रात्रभर थांबविण्यात आले, याबद्दल न्यायालयाने ईडीला चांगलेच सुनावले.

राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत नागरिकाला "झोपेचा अधिकार" आहे आणि ईडीने त्याचे उल्लंघन केले आहे. झोप न मिळाल्यास व्यक्ती आजारी पडेल आणि त्याच्या मानसिक आरोग्यावरही मरीनं होईल. त्यामुळे चौकशी कार्यालयीन कामकाजाच्या वेळेतच करावी, असे न्यालयाने म्हटले होते त्यानुसार परिपत्रक काढण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.