Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महिला IPS अधिकाऱ्यावर 7 पोलिसांची 'नजर' लोकेशन ट्रेस करणं पडलं महागात

महिला IPS अधिकाऱ्यावर 7 पोलिसांची 'नजर'
लोकेशन ट्रेस करणं पडलं महागात



जयपूर : खरा पंचनामा

आतापर्यंत तुम्ही पोलिसांना अनेकांचं मोबाईल लोकेशन ट्रेस करताना पाहिलं असेल. पण पोलिसांनीच पोलिसाचंच मोबाईल लोकेशन ट्रेस केल्याच्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानमध्ये 7 पोलिसांनी त्यांच्याच लेडी बॉस आयपीएस अधिकाऱ्यावर लक्ष ठेवलं. त्यांचा मोबाईल गुप्तपणे ट्रेस केला. त्यानंतर या सातही पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.

भिवडीच्या पोलीस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांचा मोबाईल फोन काही काळापासून ट्रेस केला जात होता. याची माहिती भिवडी एसपींना 6 ऑक्टोबरला कळली. त्यानंतर तपास सुरू झाला. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांचा मोबाईल दुसरं कुणी नाही, तर त्यांच्याच विभागातील पोलीस ट्रेस करत होते, हे समजलं आणि एसपी मैत्रेयी यांना धक्काच बसला. पोलीस अधीक्षक ज्येष्ठा यांनी सांगितलं की, माझ्याच विभागाचे पोलीस असं करतील, अशी मला अपेक्षा नव्हती.

एसपी मैत्रेयी यांनी याप्रकरणी पोलीस मुख्यालयाला पत्र लिहिलं. एसपींच्या तक्रारीवरून पोलीस मुख्यालयाने विभागीय चौकशी केली आणि कडक कारवाई केली. 7 ऑक्टोबर रोजी भिवडी सायबर सेलच्या उपनिरीक्षकासह 7 पोलिसांना निलंबित केलं. निलंबित पोलिसांमध्ये उपनिरीक्षक श्रावण जोशी, हेड कॉन्स्टेबल अवनीश कुमार, कॉन्स्टेबल राहुल, सतीश, दीपक, भीम आणि रोहितश यांचा समावेश आहे. हे सर्वजण मिळून त्यांच्याच जिल्ह्याच्या एसपीचे मोबाईल लोकेशन गुप्तपणे ट्रेस करत होते.

पोलीस अधीक्षक ज्येष्ठा मैत्रेयी यांचं मोबाईल लोकेशन त्यांच्याच विभागाच्या पोलिसांनी गुप्तपणे ट्रेस केल्याचं समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. ही बाब केवळ भिवडी आणि जयपूर येथील पोलीस मुख्यालयातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील पोलीस विभागात चर्चेचा विषय बनली आहे. पोलीस हे नेमकं कोणाच्या सूचनेवर करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.