Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

टॉयलेट वापरायचंय? आधी फॉर्म भरा... Mumbai Metro चा अजब नियम

टॉयलेट वापरायचंय? आधी फॉर्म भरा... 
Mumbai Metro चा अजब नियम



मुंबई : खरा पंचनामा


मुंबई मेट्रोमधील वॉशरुम वापरायचे असेल तर तुम्हाला आधी एक छोटासा फॉर्म 'टॉयलेट पास' म्हणून भरावा लागेल. हा फॉर्म भरल्यानंतरच प्रावाशांना टॉयलेट वापरता येणार आहे. हे आमचं म्हणणं नसून सध्या सोशल मीडियावर या फॉर्मचा एक फोटोच व्हायरल जाला आहे. रेडीटवर एका मेट्रो प्रवाशाने या टॉयलेट पासचा फोटो पोस्ट करत हा अजब दावा केला आहे. मेट्रो स्थानकामधील टॉयलेट वापरण्यासाठी आधी या टॉयलेट पासवरील तपशील भरावा लागणार असल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे.

मुंबई मेट्रोने प्रवास करताना या व्यक्तीला वॉशरुम वापरायचं होतं तेव्हा त्याला आतमध्ये प्रवेश करायचा असेल तर आधी हा टॉयलेट पास भरुन द्या असं सांगत हातात एक कागद टेवकण्यात आला. या कागदावर वरील भागात 'टॉयलेट पास' अस लिहिलेलं आहे. या वर नाव, मोबाईल नंबर आणि तिकीट टोकन नंबर असा तपशील भरल्यानंतरच मेट्रो स्टेशनवरील टॉयलेट वापरता येणार असल्याचा दावा या प्रवाशाने केला आहे. हा फोटो शेअर करताना या प्रवाशाने एक मजेदार कॅप्शन या फोटोला दिली आहे.

"तुम्हाला लघवी करायची आहे तर तुम्हाला अंबानींच्या मेट्रोमध्ये आधी टॉयलेट पासवरील तपशील भरावा लागेल. होय टॉयलेट पास," अशी कॅप्शन या टॉयलेट पासचा फोटो शेअर करताना या व्यक्तीने दिली आहे.

रेडीटवर या पोस्टवर अनेकांच्या उड्या पडल्या. अनेकांनी खरोखरच असा पास भरुन घेतला जातोय याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. तर अनेकांना यावर विश्वासच बसत नसल्याचं म्हटलं आहे. काहींनी तर अचानक नेचर्स कॉल आला तर आधी फॉर्म भरत उभं राहायचं का? असा प्रश्न विचारला आहे. "तुम्हाला लघवी करायची असेल तर आधी फॉर्म भरा मग पैसे भरा आणि वापरा," असा टोला एकाने लगावला आहे. अन्य एकाने, "तुमच्या युरिनचे आणि विष्ठेच्या नमुन्यांचे रिपोर्ट देण्यासाठी त्यांना तुमचं नाव आणि फोन नंबर हवा असणार," असा खोचक टोला लगावला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.