२०० रुपयांच्या नोटा होणार चलनातून बाद?
RBI ने तब्बल १३७ कोटी रुपयांच्या नोटा काढून टाकल्या
नवी दिल्ली : खरा पंचनामा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २००० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या आहे. २००० रुपयांच्या नोटांनंतर आता २०० रुपयांच्या नोटादेखील चलनातून काढल्या जाऊ शकतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १३७ कोटी रुपये किंमतीच्या २०० रुपयांच्या नोटा काढून टाकल्याचे सांगण्यात येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील ६ महिन्यात या नोटा काढून टाकल्या आहेत. त्यामुळे आता २०० रुपयांच्या नोटादेखील चलनातून बाद होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मिडिया माहितीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया २०० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या तयारीत नाही आहे. या नोटा काढून टाकण्याचे कारण म्हणजे २०० रुपयांच्या अनेक नोटा खराब झाल्या होत्या. खराब अवस्थेत असलेल्या नोटा काढून टाकण्यात आल्या आहेत. बँकेच्या मगील सहा महिन्याच्या रिपोर्टमध्ये १३७ कोटी रुपयांच्या २०० रुपयांच्या नोटा काढून टाकल्या आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागील वर्षा देखील १३५ कोटी रुपये मूल्य असलेल्या २०० रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर काढल्या होत्या. दरम्यान, खराब झालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी अनेक नोटा या काढून टाकल्या जातात.
मीडिया रिपोर्टनुसार, सर्वात जास्त खराब नोटा या ५०० रुपयांच्या आहेत. मागील वर्षी तब्बल ६३३ कोटी रुपये मूल्य असलेल्या ५०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या होत्या. यातील काही नोटा फाटलेल्या होत्या. काही नोटांवरचे नंबर पुसले गेले होते. त्यामुळे या नोटा काढून टाकल्या होत्या. आरबीआयच्या रिपोर्टनुसार, ५ रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंतच्यादेखील अनेक नोटा काढून टाकण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.