गुजरातमध्ये छापायचे आणि मुंबईत घेऊन यायचे, मतदानापूर्वी 51 लाखांच्या बनावट नोटा जप्त
मीरा भाईंदर : खरा पंचनामा
निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना गुजरातवरून मीरा रोडला आलेल्या तरुणाकडे 51 लाख 70 हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या सापडल्याने एकच खळबळ उडाली. या नोटा मतदारांना वाटण्यात येणार होत्या का ? या नोटा नेमके कोणी मागवल्या, तो नोटा कोणाला देणार होता याचा पोलीस तपास घेत आहेत.
पोलीस निरीक्षक हितेंद्र विचारे आणि मनोहर तावरे यांना बनवाट नोटा गुजरातहून येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. १५ तारखेला ०३.०० च्या सुमारास डॉन बास्को स्कुल जवळ, मुन्शी कपाऊन्ड, प्रेझेन्ट पार्क रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर, मिरारोड पुर्व येथे बॅगेमध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा वितरीत करण्यासाठी घेवून येणार असल्याची माहिती मिळाली होती.
या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावला. मीरारोडच्या प्लेझंट पार्क ते मुन्शी कम्पाउंडकडे जाणाऱ्या रस्त्यावर आर्यन मनसुखभाई जाबूचा याच्या पोलिसांनी मुस्क्या आवळल्या. त्याच्याकडून 500 रुपयांच्या 10,352 बनावट नोटांची 53 बंडले सापडली. या 51 लाख 70 हजार रुपये किमतीच्या बनावट नोटांसह दोन मोबाइल फोनही जप्त केले.
मूळ गुजरातचा राहणारा आर्यन मनसुखभाई जाबूच्या डोक्यावर कर्ज झालं होतं. त्यामुळे त्याने सुरुवातीला एक प्रिंटर घेतला मात्र नोटा व्यवस्थित हुबेहूब दिसत नव्हते. त्याने दुसरा ऑफसेट प्रिंटिंग मशीन खरेदी केली. त्या मशीनद्वारे भारतीय चलनातील बनावट नोटा छापून त्याने त्याचाच मित्र असलेल्या उल्हासनगरला त्याच्या एका फ्लॅटवर नोटा ठेवण्यात आल्या होत्या. तो गुजरात मध्ये छपाई करून मुंबईमध्ये चीटर लोक दुप्पट पैसे देणाऱ्या लोकांना हेरायचं त्या लोकांना तो बनावट नोटा देण्याच्या इराद्यामध्ये होता. सध्या निवडणुकीची धामधूम असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी या बनावट नोटांचा वापर करता येईल या उद्देशाने तो आला असावा असा पोलिसांचा कयास आहे. आर्यन याने मीरा-भाईंदर मध्ये एक लॉज बुक केला होता आणि त्या ठिकाणी तो राहत असे. उल्हासनगरचा मित्र त्याच्या एका फ्लॅटमध्ये छपाई केलेले पैसे ठेवत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिले आहे. तसंच आर्यन हा गुजरातच्या एका बड्या बापाचा बेटा असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यासाठी त्याने एका मोस्ट वॉन्टेड आरोपीची मदत घेतली असल्याचे पोलीस तपासात समोर आलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.