बॅगा तपासल्या, चकल्या सापडल्या; अजितदादा म्हणाले, खा खा बाबा...
बारामती : खरा पंचनामा
राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत नेतेमंडळी एकमेकांवर सडकून टीका करताना दिसत आहेत.
मतदानाचा दिवस जसा जसा जवळ येत आहे, तसा तसा प्रचाराला वेग येत आहे. राज्यातील प्रमुख नेते विविध जिल्ह्यात जाऊन जाहीर सभा घेत आहेत. यादरम्यान राजकीय नेत्यांसोबत असणाऱ्या बॅगेची तपासणी देखील केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.
बारामतीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या हॅलिकॉफ्टरची तापासणी केली. अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासण्यात आल्या. अजित पवारांनी फोनवर बोलत असातान स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा- खा बाबा... सगळ्या बॅगा तपास... त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर... असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना दिसले.
लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची विमानतळावर बॅगेची तपासणी करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी वणी येथेही असाच प्रकार झाला होता. यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतः व्हिडीओ करत कर्मचाऱ्यांची उलट तपासणी केली. तो व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमावर टाकला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होती. या सभेतही बॅग तपासणीवर त्यांनी जोरदार टीका केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.