सिद्दीकींचा मृत्यू झाला का? कन्फर्म करायला थांबला होता हल्लेखोर, हॉस्पिटलबाहेर...
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आलीय. शिवकुमार गौतम असं आरोपीचं नाव असून त्याने हत्याकांडाबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. शिवकुमार गौतमने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांचा मृत्यू झालाय का याची खात्री केली. तो गोळीबारानंतर फरार झाला नाही. तर रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला की नाही हे समजेपर्यंत तो थांबला होता. पोलिसांनी तीन पैकी दोन हल्लेखोरांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितलं की, बाबा सिद्दीकींवर गोळीबार केल्यानंतर शिवकुमार हा लीलावती रुग्णालयाच्या बाहेर उभा होता. सिद्दीकींचा मृत्यू झालाय की नाही याची माहिती त्याला घ्यायची होती. गोळीबारानंतर त्याने टीशर्ट बदलला आणि रुग्णालयाबाहेर गर्दीत अर्धा तास उभा होता.
शिवकुमार गौतमला जेव्हा समजलं की सिद्दीकी यांच्या प्रकृती गंभीर आहे तेव्हा तो तिथून निघून गेला. आरोपीने सांगितलं की, सुरुवातीला प्लॅन होता की, दोन सहकाऱ्यांसह धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंह यांना उज्जैन रेल्वे स्टेशनवर भेटणार आणि तिथून बिश्नोई गँगचे मेंबर त्यांना वैष्णोदेवीला घेऊन जाणार होते. पण धर्मराज आणि गुरमैल यांना अटक झाल्यानं प्लॅन फेल झाला.
आरोपी शिवकुमार नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होता. मुंबई क्राइम ब्रांचने उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने शिवकुमार गौतमला अटक केलीय. त्याच्यासह चौघांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी नेपाळ बॉर्डरजवळ त्यांना अटक केली.
एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, शिवकुमारने सांगितलं की बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर त्याला दहा लाख रुपये आणि दर महिन्याला काही मिळणार होते. पोलिसांनी या हत्या प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना अटक केलीय. शिवकुमार आणि चार इतर आरोपींना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.