प्रियांका गांधीना जुना सहकारी विमानतळावर दिसताच ताफा अचानक जागेवर थांबला!
कोल्हापूर : खरा पंचनामा
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रथमच कोल्हापूर दौरा केला. गांधी मैदानात त्यांची विराट सभा पार पडली. सभा पार पडल्यानंतर प्रियांका दिल्लीसाठी रवाना झाल्या. मात्र, दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी कोल्हापूर विमानतळावर एक अनोखा प्रसंग घडला आणि त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
प्रियांका गांधी यांचा कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पार्किंगमध्ये उभे असलेल्या बाजीराव खाडे यांच्याकडे लक्ष गेले. आपल्या टीममधील जुना सहकारी प्रियांका गांधी यांनी ताफा अचानक थांबवला. बाजीराव खाडे प्रियांका गांधी यांच्या टीममधील एक सदस्य होते. त्यामुळे प्रियांका आणि बाजीराव खाडे यांचे जवळचे संबंध आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभेला बंडखोरी केल्याने काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
प्रियांका गांधी कोल्हापूर विमानतळावर आल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी बाजीराव खाडे विमानतळाच्या पार्किंगमध्ये थांबले होते. लांबूनच बाजीराव खाडे यांना पाहिल्यानंतर प्रियांका गांधी यांचा ताफा अचानक थांबला. प्रियांका गांधी यांनी बाजीराव खाडे यांना बोलवून घेतलं आणि विचारपूस केली. मात्र, ताफा थांबवल्यामुळे सुरक्षारक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.