मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणः जयदीप आपटेच्या अर्जावर ३ डिसेंबरला सुनावणी
मालवण : खरा पंचनामा
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या शिल्पकार जयदीप आपटे याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी सुनावणी ३ डिसेंबर रोजी निश्चित केली.
दरम्यान, सरकारने जयदीपविरोधात कनिष्ठ न्यायालयात सादर केलेल्या २ हजार पानांच्या आरोपपत्राची प्रत उच्च न्यायालयात सादर केली.
मालवणच्या राजकोट किल्ला परिसरात उभारलेला शिवरायांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेने पुतळा उभारणीचे निकृष्ट काम उघड झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटेला ४ सप्टेंबर रोजी कल्याणमधून अटक करण्यात आली. याप्रकरणी जामीन मिळावा म्हणून आपटे याने मुंबई उच्च न्यायालयात अॅड. गणेश सोवनी यांच्या मार्फत अर्ज दाखल केला. या अर्जावर न्यायमूर्ती, अनिल किलोर यांच्या एकल पीठासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने अर्जाची सुनावणी ३ डिसेंबर रोजी निश्चित केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.