"मी पवारसाहेबांना सोडलेलं नाही, तर..."
बारामती : खरा पंचनामा
राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अजित पवार आज गावभेट दौरा करीत आहेत. बारामतीमधील ढाकाळे इथं भेट देऊन गावभेट दौऱ्याला सुरुवात झालीय. बारामतीमधील ढाकाळे, माळेगाव खुर्द आणि कऱ्हावागज या गावांचा अजित पवार गावभेट दौरा करणार आहेत.
गावभेट दौऱ्या दरम्यान अजित पवार हे नागरिकांशी संवाद साधून मार्गदर्शन करत आहेत. बारामतीतील माळेगावमध्ये बोलताना अजित पवांरांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. लोकांना वाटत होतं की मी शरद पवार साहेबांना मी सोडायला नको होतं. परंतु मी साहेबांना सोडलं नाही. सर्व आमदारांच्या सह्या होत्या, असं अजित पवार म्हणाले.
माळेगावमधील काही पुढारी चुकीचं काम करतायेत. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायचं असेल तर उघड करा. पूर्वी आमदार झालो. त्यावेळी याठिकाणी काय होतं, कुसळं यायची. आता काय परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या. साहेबांचा आदर राखून ताईना साथ दिली. आता मला साथ द्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत. ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे. पुढच्या पिढीसाठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा. मी न मागता सगळं करतोय. याची तुम्हाला किंमत कळत नाही. मी कॅनॉलचं पाणी आणलं नसतं, तर ऊसाचं पाचट झाली असती. विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे.. पवार साहेबांनी रिटायर झाले मग बारामती कडे कोण लक्ष देऊ शकतो. लोकसभेला साहेबांला साथ दिली. आता मला साथ द्या, अजित पवार माळेगावमध्ये बोलताना म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.