बच्चू कडूंना धक्का! अधिकृत उमेदवारच गेला काँग्रेसच्या गोटात
अमरावती : खरा पंचनामा
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी महायुती व महाविकास आघाडीला आव्हान देण्यासाठी राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. राज्यातील जनतेला पर्याय देण्यासाठी कडूंनी प्रयत्न चालवले आहेत. त्यात बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा उमेदवार काँग्रेसच्या गळाला लागला आहे. बच्चू कडूंना त्यांच्या अमरावती या गृह जिल्ह्यात हा मोठा धक्का बसला आहे. अधिकृत उमेदवारानेच थेट काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आमदार बच्चू कडू, छत्रपती संभाजी राजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, विदर्भवादी नेते वामनराव चटप यासह समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी राज्यात परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन केली आहे. परिवर्तन महाशक्ती आघाडी राज्यातील विधानसभा निवडणुकांना एकत्रित समोर जात आहे. तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बच्चू कडू राज्यभर फिरून प्रचार सभा घेत आहेत.
बच्चू कडूंच्या प्रचार सभांना मोठा प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. असं असतानाच अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर विधानसभेत बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.