उद्योजक अतुल खोत याना मातृशोक
श्रीमती सुषमा खोत यांचे वृद्धापकाळाने निधन
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्ह्याचे व्होडाफोन-आयडियाचे डीलर, उद्योजक अतुल खोत यान रविवारी सकाळी मातृशोक झाला. श्रीमती सुषमा वसंतराव खोत (वय ७८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. विविध क्षेत्रातील मान्यवर खोत यांच्या निवासस्थानी खोत कुटुंबियांच्या सांत्वनासाठी उपस्थित आहेत.
त्यांच्या पार्थीवावर दुपारी चार वाजता सांगलीतील अमरधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी धामनी रस्ता परिसरातील पार्श्वनाथनगर, विश्रामबाग येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.
श्रीमती खोत यांच्या पश्चात मुलगा अतुल, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. गवर्नमेंट कॉन्ट्रैक्टर राजेंद्र आडमुठे यांच्या त्या सासू होत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.