"14 निवडणुका लढल्या, बारामतीकरांनी एकदाही घरी पाठवलं नाही, आता."
बारामती : खरा पंचनामा
मी आतापर्यंत 14 निवडणुका लढविल्या आहेत. बारामतीच्या लोकांनी एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच दिलं आहे. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवीन पिढीला आणलं पाहिजे. दीड वर्षानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार मला करावा लागेल, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) शरद पवार यांनी संसदीय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. ते सुपा येथे युगेंद्र पवार यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, "मी सत्तेत नाही. राज्यसभेत खासदार आहे. अजून माझ्या खासदारकीची दीड वर्षे आहेत. दीड वर्षानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार मला करावा लागेल. लोकसभा मी लढणार नाही. कोणतीच निवडणूक लढणार नाही. किती निवडणुका लढायच्या असतात? आतापर्यंत 14 निवडणुका लढल्या. तुम्ही लोकांनी एकदाही घरी पाठवलं नाही. दरवेळी निवडूनच देत आहात. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे. नवीन पिढीला आणलं पाहिजे."
"याचा अर्थ मी समाजकारण सोडलं नाही. सत्ता नको. लोकांची सेवा, त्यांचं काम हे मात्र करत राहायचं. समाजातील उपेक्षित, आदिवासी आणि गरीब वर्गासाठी काम करण्याचा निर्णय माझा स्वतःपुरता आहे. राज्य निट चाललं पाहिजे. राज्याचा चेहरा बदलला पाहिजे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. त्यासाठी नवी पिढी तयार केली पाहिजे," असं शरद पवार यांनी म्हटलं
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.