'मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही, कारण..'
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीला अवघे काही दिवस उरले आहेत. पुढच्या आठवड्यात २० नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी चर्चा आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, असं म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा अशी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविकच आहे. मात्र वस्तुस्थिती पाहायची असते. आघाडी किंवा महायुतीचं राजकारण हे वास्तवावर आधारीत असतं. तिथे भावनेला प्राधान्य देता येत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची कुठलीही शर्यत नाही, मी अशा अशा कुठल्याही शर्यतीत सहभागी नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मी राज्याचं नेतृत्व करत होतो. त्यात महाराष्ट्रात अपयश आलं. मात्र त्यानंतरही पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली. माझ्यासाठी ही बाब पुरेशी आहे. मुख्यमंत्री होणं माझ्यासाठी गौण बाब आहे.
होय आम्ही एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जास्त जागा दिल्या कारण एकनाथ शिंदे हे जवळपास अडीच वर्षे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्यांची ताकद निर्माण केली. अजित पवार एक वर्षे उशिराने सरकारमध्ये आले. त्यांना दीड वर्षेच मिळाले. त्यातही अजित पवार यांना शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्यासोबत लढा द्यायचा असल्याने त्यांची सर्व ताकद प्रयत्नपूर्वक एकवटायची होती. त्यातच त्यांचा सुरुवातीचा काळ गेला. एकनाथ शिंदे यांच्याकडे पुरेसा वेळ होता. त्यांनी त्यांची ताकद एकवटत विस्ताराकडेही लक्ष दिले. शिवाय त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचाही फायदा मिळाला. त्यामुळेच त्यांना लढविण्यासाठी जास्त जागा मिळाल्या, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.