दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी गुन्हेगारी हालचालींची माहिती एकमेकांना द्यावी
महाराष्ट्र, कर्नाटकातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या सूचना
कोल्हापूर : खरा पंचनामा
महाराष्ट्र कर्नाटकातील सीमा भागात होणाऱ्या गुन्हेगारी हालचालींवर पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग, आरटीओ आदी विभागांनी कडक वॉच ठेवावा. आंतरराज्य तपासणी नाके, प्रलंबित अजामीनपात्र वारंट, भेटवस्तू साठा आणि त्याचे वाटप, अवैध रोकड वाहतूक, गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी एकमेकांना द्यावी अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी दिल्या.
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर येथील दोन्ही राज्यातील पोलिस, महसूल, राज्य उत्पादन शुल्क, वनविभाग, आरटीओ अधिकाऱ्यांची समन्वय बैठक महानिरीक्षक श्री. फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत त्यांनी आंतरराज्य तपासणी नाक्यावरील कारवाईचा आढावा घेतला. महानिरीक्षक श्री. फुलारी म्हणाले, अजामीनपात्र वारंट बजावणीस प्राधान्य द्या. पाहिजे असलेले गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्या यांच्या माहितीचे आदान-प्रदान दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी करावे. उपविभागीय स्तरावर समन्वय बैठकांचे आयोजन करून गोपनीय माहितीचेही आदान-प्रदान करावे, असेही फुलारी यांनी सांगितले.
अवैध शस्त्रे, रोख रक्कम, मद्यसाठा, गुटखा, अंमली पदार्थ यांचा साठा आणि वाहतूक याची रिअल टाईम माहितीदोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांनी एकमेकांना द्यावी. मतदानाच्या ७२ तासापूर्वी पोरस पॅईंट सील करावेत. मतदान आणि मतमोजणीवेळी कर्नाटकातील सीमवर्ती भागात ड्राय डे घोषित करावा, असेही ते म्हणाले. गुन्हेगारी हालचालींवर अधिक लक्ष केंद्रित करण्याबाबत चर्चा आणि ठोस कृती आराखडा याबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली.
या बैठकीला कोल्हापूरचे पोलिस महेंद्र पंडित, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सांगलीच्या अपर पोलिस अधीक्षक रितू खोकर, कोल्हापूरच्या अपर अधीक्षक जयश्री देसाई, बेळगावचे पोलिस महानिरीक्षक विकास कुमार विकास, बेळगावचे शहरचे पोलिस अधीक्षक श्री. मार्टीन, उपमहानिरीक्षक अजय कुमार हिलोरे, बेळगावीचे पोलिस अधीक्षक भिमाशंकर गुळदे, विजयापूरचे पोलिस अधीक्षक प्रसन्न देसाई, बिदरचे पोलिस अधीक्षक प्रदीप गुट्टी, कलबुर्गीचे पोलिस अधीक्षक अद्दरू श्रीनिवासलू यांच्यासह अन्य विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.