Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"विमानाची व्यवस्था करीन पण..."

"विमानाची व्यवस्था करीन पण..."



मुंबई : खरा पंचनामा

भाजपाकडून एका मराठी वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या एका जाहिरातीत कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशच्या योजनांबाबत उल्लेख करण्यात आला होता. काँग्रेस सरकारने वेगवेगळ्या राज्यात खोट्या गॅरंटी दिल्या असून त्या पूर्ण केल्या नाहीत, असे या जाहिरातीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. पण भाजपाच्या या जाहिरातीवर काँग्रेस नेत्यांनी आक्षेप घेत याबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

पण आता कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी याच प्रकरणावरून महाराष्ट्रातील महायुतीला कारवाईचा इशारा दिला आहे. डीके शिवकुमार यांनी महायुतीमधील नेत्यांना कायदेशीर बडगा उचलू असे सांगितले आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी X या सोशल मीडिया साइटवर याबाबतची पोस्ट केली आहे. ही पोस्ट मराठीमध्ये असून त्यांनी या पोस्टमध्ये त्यांनी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करून देईल आणि त्यांना कर्नाटकात आणेन असे म्हटले आहे. तसेच, या महायुतीच्या नेत्यांनी कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधून त्यांना सत्य जाणून घेता येईल, असे पोस्टच्या माध्यमातून म्हटले आहे. पण महायुती आणि भाजपाकडून दिशाभूल करणारी माहिती सांगण्यात येत असून जनतेती फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, असे म्हणत शिवकुमार यांनी महायुतीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला आहे.

"कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल करण्यापर्यंत ते गेले आहेत. ही बसवण्णांची भूमी आहे, आम्ही आमच्या जनतेला दिलेले वचन पाळले आहे. याबाबत कोणालाही शंका असेल, तर मी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी विशेष विमान किंवा बसेसची व्यवस्था करीन, जेणेकरून ते कर्नाटकात येऊन आमच्या लोकांशी संवाद साधू शकतील आणि सत्य जाणून घेऊ शकतील!" असे शिवकुमार यांनी पोस्टच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगितले आहे.

कर्नाटक हे संपूर्ण देशासाठी एक आदर्श राज्य आहे, कारण इथे केंद्र सरकारच्या महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्ही खात्रीशीर योजना राबवल्या आहेत. महाराष्ट्रातील भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या जनतेची फसवणूक करत, आमच्या हमी असलेल्या योजनांची नक्कल...

तसेच, आमच्या 1.22 कोटी महिलांना 'गृहलक्ष्मी' योजनेतून दरमहा 2000 रुपये मिळत आहेत. 1.64 कोटी कुटुंब 'गृहज्योती' योजनेचा लाभ घेत आहेत. 4.08 कोटी लोकांना 'अन्नभाग्य' योजनेअंतर्गत मोफत तांदूळ दिले जात आहे. 'शक्ती' योजनेद्वारे 320 कोटी महिलांनी मोफत प्रवास केला आहे. 'युवा निधी' योजनेद्वारे 5 लाख विद्यार्थ्यांना महिन्याला 3000 रुपये मिळत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिली. त्यामुळे दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी, अशी माझी मागणी आहे. अन्यथा, आम्हाला कायदेशीर कारवाईचा विचार करावा लागेल, असा थेट इशारा कर्नाटक मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी दिला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.