"फडणवीस असो की अन्य कुणी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार, माझ्या नादी लागू नका"
मुंबई : खरा पंचनामा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. असं असतानाच मलिकांनी थेट फडणवीसांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
कुणी कितीही मोठं असू द्या किंवा छोटी असू द्या. देवेंद्रजी पण असू द्या मी सगळ्यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. जर या लोकांनी माफी मागितले नाही. तर मी यांच्या विरोधात कोर्टात जाणार आहे. सिव्हिल आणि डिफेन्सेस केस टाकणार आहे, असा इशाराच नवाब मलिक यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा नबाब मलिक मागतोय का? आम्ही मागत नाही, आम्ही मागणारही नाही. मागणारा नवाब नाही, आम्ही देणारे आहोत. पण नाही देवेंद्रजीला बोलत असताना माझ्या बाबतीत त्यांच्या काय असतील. नबाब मलिक कोणाला घाबरत नाही. आता आम्ही बोलायला सुरुवात केली तर कोर्टात जाताय की यांची जामीन रद्द करा. मला तुरुगात टाका. आणखीन मला दहा- वीस हजार मत वाढतीलय माझ्या बाबतीत जे गैरसमज निर्माण करतात. दाऊदशी माझं नाव जोडतात. काही लोक आतंकवादी बोलतोय काही लोक देशद्रोही बोलतायेत. या सगळ्यांच्या विरोधात मी तपासून नोटीस पाठवणार आहे. सगळ्यांवर क्रिमिनल केस टाकणार आहे, असं नवाब मलिक म्हणालेत.
जेव्हा भाजपचे प्रचार करतायेत. तेव्हा भाजपचे प्रचारक या नात्याने तेव्हा प्रचार करतात. आम्ही कोणाला कोणाचाही पाठिंबा मागत नाही. उलट मी त्यांना आज आव्हान करतो. भाजपवाल्यांनो, ताकात लावून बघा... तुमची हिंमत असेल तर माझी जागा पाडून दाखवा. मी फटिचर माणूस आहे. कोणीही माझ्या नादी लागू नका, असा इशारा मलिकांनी दिला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.