विनोद तावडे आणि शाह यांच्या बैठकीत मराठा समीकरणावर चर्चा
दिल्ली : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. अशातच भाजपचे नेते विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत 'महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा' या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे.
मराठा मुख्यमंत्री द्यायचा का? यावरून मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय रखडला आहे का? असा प्रश्न आहे. कारण राज्याच्या मुख्यमंत्रिपदी मराठा चेहरा नसल्यास, त्याचे काय परिणाम होतील? यावर अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांनी आंदोलन उभारल्यानंतर एकवटलेला मराठा समाज, याचा राज्याच्या मुख्यमंत्री निवडीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विनोद तावडे आणि शाह यांच्या बैठकीत मराठा समीकरणावर चर्चा झाली आहे.
'महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा' या समीकरणावर चर्चा झाली आहे. अमित शाहांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्राच्या मराठा समाजाची समीकरणं समजून घेतली.
देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मतांवर काही फरक पडेल का? किंवा ती कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाच्या मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेह-याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची केंद्रीय नेतृत्वाला चिंता आहे.
मराठा समाज आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाहांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच २०१४ ते २०२४ पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा घेतला आढावा.
भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे याबाबत सर्व गणितांची मांडणी केली. आगामी निवडणुका, फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीच्या मतांबाबतही चर्चा केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.