मोदींचा महाराष्ट्रासाठी महामंत्र, "एक है तो सेफ है!!"
धुळे : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचाराचा शुभारंभ करताना बटोगी तो कटोगे या घोषणेच्या पलीकडे जाऊन एक महामंत्र दिला "एक है, तो सेफ है!!"
राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन जातनिहाय जनगणना त्याचबरोबर जातीगत समीकरणे जुळवायचा प्रयत्न करून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा अजेंडा पुढे चालवला त्याला मोदींनी महाराष्ट्रात धुळ्यापासून सुरुवात करून प्रत्युत्तर दिले.
मोदींनी महाराष्ट्र दौऱ्याचा प्रारंभ धुळ्यातून केला. या धुळे लोकसभा मतदारसंघात बाकी सर्व विधानसभा मतदारसंघात लीड घेऊनही भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे केवळ मालेगाव मतदारसंघात पिछाडीवर राहिल्याने पराभूत झाले होते. मुस्लिमांच्या एकगठ्ठा मताने त्यांचा पराभव केला. या पार्श्वभूमीवर मोदींनी त्यांच्याच धुळ्यात येऊन "एक है तो सेफ है!!" हा महामंत्र दिला. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात त्याचबरोबर उत्तर प्रदेशात बटोगे तो कटोगे ही घोषणा दिला होती. त्या पलीकडे जाऊन आज मोदींनी "एक है तो सेफ है!!" हा महामंत्र दिला.
धुळ्याच्या प्रचार सभेत त्यांनी महाविकास आघाडीचे पुरते वाभाडे काढले. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते कोर्टापर्यंत गेले, पण आता ते स्वतःच महायुतीच्या योजना चोरून स्वतःच्या जाहीरनाम्यात घुसवत आहेत, असा टोला मोदींनी हाणला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.