कोल्हापूरकरांचा नाद खुळा, ज्यांना ऋतुराज हरणार वाटतंय त्याने पैज लावा!
कोल्हापुर : खरा पंचनामा
कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता कोल्हापुरातील एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे. हे पोस्टर पाहून तुम्हीही म्हणाल की फक्त कोल्हापुरात होऊ शकते. कारण निकालाला अगदी काही तास बाकी असताना कोल्हापुरात मात्र पैजा रंगू लागल्या आहेत. या पैजा छोट्या मोठ्या नाही तर थेट फार्च्यूनरची लागली आहे.
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या महाडिक आणि पाटील गटात थेट लढत झाली आहे. काँग्रेसकडून आमदार ऋतुराज पाटील तर भाजपकडून अंमल महाडिक हे निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्हीही गटाकडून यंत्रणा आणि प्रचारात आघाडीवर राहिल्याने येत्या काही तासातच कोणाच्या बाजूने कौल लागणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
ऋतुराज पाटील यांच्या विजयाचा आत्मविश्वास असलेल्या नेर्ली गावच्या सागर पाटील यांनी चक्क फॉर्च्यूनर गाडीची पैज लावली आहे. त्यांनी ऋतुराज पाटील आमदार होणार नाही असे वाटत असेल त्यांनी ही पैंज स्वीकारावी असे थेट आव्हानच त्यांनी दिले आहे.
काय लिहलय व्हायरल पोस्टरमध्ये?
पैज फॉर्च्यूनर गाडीची... आमदार ऋतुराज पाटीलचं होणार... जर कोणाला वाटत असलं दादा आमदार होणार नाही त्यांनी पैज लावावी.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.