"सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही"
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सतत सरकार विरोधात निकाल देणे म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र आहे हा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे खडे बोल सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सुनाविले आहेत. तसेच चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचेही आवाहन नागरिकांना केले आहे.
दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात बोलताना चंद्रचूड यांनी न्यायव्यवस्थेबाबत भाष्य केले आहे. न्यायव्यवस्था निष्पक्ष असली पाहिजे यावरही त्यांनी जोर दिला आहे. चंद्रचूड म्हणाले, की इलेक्टोरल बँडबाबत मी जेव्हा केंद्र सरकारविरोधात निर्णय दिला होता. तेव्हा माझा निर्णय निष्पक्ष मानला जात होता. तर दुसरीकडे सरकारच्या बाजूने एखादा निर्णय घेतला तर स्वातंत्र्याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. त्यामुळे मला वाटत नाही स्वातंत्र्यतेची ही व्याख्या असेल. पंतप्रधान माझ्या घरी गणपजी पुजेसाठी येत असतील तर त्याच चुकीचे काय आहे. कारण, समाजात वावरताना न्यायव्यवस्था आणि प्रशासनातील व्यक्तिंच्या सतत बैठका होत असतात. राष्ट्रपती भवनातही आम्ही स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात भेटतच असतो.
राम मंदिरबाबत घेतलेल्या निर्णयाबाबत चंद्रचूड म्हणाले, अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा तीन महिने माझ्यासमोर होता. मी देवासमोर बसलो आणि यातून समाधानकारक मार्ग काढण्याची प्रार्थना केली. तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर त्यातून नक्कीच मार्ग निघतो.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.