Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दोन देशी बनावटीची पिस्तूल, एक गावठी कट्टा जप्त धुळे येथील तरूणाला अटक, विश्रामबाग पोलिसांची कारवाई

सांगलीत दोन देशी बनावटीची पिस्तूल, एक गावठी कट्टा जप्त
धुळे येथील तरूणाला अटक, विश्रामबाग पोलिसांची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

शहरातील गोकुळनगर परिसरात दोन देशी बनावटीची पिस्तूल, एक गावठी कट्टा, दोन मॅगझीन, ८ काडतुस घेऊन विक्रीसाठी आलेल्या धुळे येथील तरूणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १.२९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली. 

यासिन उर्फ सोनू शगीर मेहतर (वय २३, रा. भंगार बाजार, धुळे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे तसेच त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना विश्रामबागचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शाखेचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी गोकुळनगर येथे एक तरूण पिस्तूल विक्रीसाठी आल्याची माहिती पथकातील बिरोबा नरळे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. 

पथकाने गोकुळनगर येथे सापळा रचला होता. माहितीप्रमाणे तरूण तेथे आल्यानंतर त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या सॅकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये दोन देशी बनावटीची पिस्तूल, एक गावठी कट्टा, दोन मॅगझीन, ८ काडतुस सापडली. त्याबाबत मेहतर याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने पिस्तूल आणि गावठी कट्टा विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्याच्याकडील मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली. 

विश्रामबागचे पोलिस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाने सहायक निरीक्षक चेतन माने, बिरोबा नरळे, संपत साळुंखे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर, स्नेहल मोरे, गणेश बामणे, योगेश पाटील, महम्मद मुलाणी, अमर मोहिते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.