जयश्री मदन पाटील कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित
प्रदेश कॉंग्रेसकडून कारवाई
मुंबई : खरा पंचनामा
सांगलीतील कॉंग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील यांना कॉंग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशावरून ही कारवाई करण्यात आल्याचे कॉंग्रेसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष (प्रशासन व संघटन) नाना गावंडे यांची सही आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तरीही महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या जयश्री मदन पाटील या सांगली मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी केलेल्या बंडखोरीची पक्षश्रेष्ठींनी चांगलीच दखल घेतली आहे. त्यामुळेच त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
कॉंग्रेसने प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, "महाराष्ट्र राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये २८२ - सांगली विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार निवडणूक लढवत असताना देखील आपण अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहात. आपले हे कृत्य पक्षशिस्तीचा भंग करणारे असल्याने प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून आपणास कॉंग्रेस पक्षातून पुढील ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे". असे या पत्रात म्हटले आहे. या पत्राच्या प्रति जयश्री मदन पाटील यांच्यासह कॉंग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना पाठवण्यात आल्या आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.