Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"आबांना सांगितलं होतं की संजयकाका भरवशाचा नाही"

"आबांना सांगितलं होतं की संजयकाका भरवशाचा नाही"



सांगली : खरा पंचनामा

विधान परिषद जागेसाठी आर आर पाटील यांनी संजयकाका पाटील यांचा अर्ज आणला होता, पण त्यांना सांगितलं होतं की हा भरवशाचा नाही, पण आर आर पाटील यांच्या आग्रहास्तव आमदार केलं, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी संजयकाका पाटील यांच्यावर तोफ डागली.

शरद पवार म्हणाले की, एकदा विधानपरिषदेसाठी आर आर आबांनी संजयकाकांचे नाव सुचविले, पण ज्या दिवशी नाव जाहीर केले त्यावेळी संजयकाका भाजपमध्ये गेले. 10 वर्ष खासदार म्हणून काम केले, एक कार्यक्रम संजयकाकानी घेतला होता. उद्याच्या निवडणुकीमध्ये काय चित्र आहे असे विचारल्यावर सगळे व्यवस्थित आहे असे काका म्हणाले आणि 8 दिवसाने वाचले की याच माणसानं विधानसभेसाठी अर्ज भरला.

खासदार असताना काम केले नाही, आता कारखाना आणि संघ या संस्था कोणत्या स्थितीत आहेत यावरून ती व्यक्ती कसे आहे हे समजते. आता हीच व्यक्ती रोहितच्या विरोधात ही व्यक्ती उभी आहे. जनता मात्र रोहितच्या पाठीशी उभी राहील हा विश्वास आहे. आर आर आबांचा वारसा रोहित चालवत असेल, तर तुतारीवर बटन दाबून रोहीतला विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी सांगितले की, आज आर आर नाही याचे दुःख आहे, तुम्ही जगले पाहिजे असे आम्ही बोललो होतो, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ शकत नाही असे हॉस्पिटलमध्ये मी आर आर ना बोललो होतो. आर आर तासगावपुरते नव्हते, तर महाराष्ट्रभर आर आर आणि कुटूंबाचे चौकशी करत होते. त्यांची पुढची पिढी उभी राहत असेल तर त्यांना विजयी कराच, पण मतांचा विक्रम करा.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.