महाराष्ट्र पोलीस अकादमीत ग्राऊंड ट्रेनरचा संशयास्पद मृत्यू
नाशिक : खरा पंचनामा
येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत ग्राऊंड ट्रेनरचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत पोलीस अंमलदार बुधवारी (दि. ६) मध्यरात्री कर्मचारी वसाहतीतील एका इमारतीखाली जखमी अवस्थेत मिळून आले होते. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यांनी आत्महत्या केली की घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधाण आले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सतिश अशोक भालेराव (३० रा.ए विंग सप्तशृंगी बिल्डीग पीटीसी) असे मृत पोलीस अंमलदाराचे नाव आहे. भालेराव पोलीस अकादमीत ग्राऊंड ट्रेनर म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास ते सप्तशृंगी बिल्डींगच्या बी विंग भागात जखमी अवस्थेत मिळून आले. डोक्यास गंभीर मार लागल्याने बेशुध्द अवस्थेत त्यांना आरटीआ सचिन चिवडे यांनी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले.
या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलीस अकादमीसह शहर आणि ग्रामिण दलातील अधिकारी कर्मचा-यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली होती. भालेराव वास्तव्यास असलेल्या बिल्डींग शेजारील इमारतीखाली मिळून आल्याने त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला याबाबत उलटसुलट चर्चेस उधान आले आहे. अधिक तपास हवालदार किशोर पगार करीत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.