सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणची मोठी कारवाई
हजारो ग्राहकांची वीज तोडली
कोल्हापूर : खरा पंचनामा
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने कोल्हापूर परिमंडळामध्ये प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ९३ हजार ४१९ ग्राहकांकडे ७२ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे.
थकबाकी वसुलीच्या सूचना देण्यात आल्या असल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील वीज बिल न भरणाऱ्या २३४२ वीज ग्राहकांचा पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अजून लोकांच्या अंगावर गुलाल आहे, तोपर्यंतच ही वसूली सुरू झाली आहे. वीज वापरली असल्याने त्याचे बिल वेळेत देणे ही ग्राहकांची जबाबदारीच आहे, परंतु निवडणूक असल्याने थकबाकी वसुलीची मोहीम सुरू नव्हती.
कोल्हापूर परिमंडळात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये सांगली जिल्ह्यात २ लाख ४३ हजार १२९ ग्राहकांकडे ३६ कोटी ७४ लाख आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकूण २ लाख ५० हजार २९० ग्राहकांकडे ३५ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. वीजबिल वसूलीवरच महावितरणचा डोलारा अवलंबून असल्याने वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कोल्हापूर परिमंडळात नोव्हेंबर महिन्यात वीज बिल थकविणाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील १२३१ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ६९ लाखांची थकबाकी होती, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ११११ ग्राहकांचा समावेश असून, त्यांच्याकडे ४२ लाखांची थकबाकी आहे. ग्राहकांनी थकीत बिलांचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
कुणाकडे किती थकबाकी?
कोल्हापूर : २ लाख ५० हजार २९०
ग्राहक : ३५ कोटी ५० लाख
सांगली : २ लाख ४३ हजार १२९
ग्राहक : ३६ कोटी ७४ लाख
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.