कोकण दरोडेखोरांच्या हातात द्यायचं का?
सावंतवाडी : खरा पंचनामा
धारावी अदानीच्या घशात घालण्यात आली, तसेच दीपक केसरकर कोकण त्या लोकांच्या घशात घालतील त्यांना गाडलं पाहिजे, अशा शब्दात शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सावंतवाडीमध्ये बोलताना घणाघाती प्रहार केला. ठाकरे यांची कोकणमध्ये सभा होत असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष होते. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर यांच्या विरोधात ठाकरे गटाचे राजन तेली उमेदवार आहेत. ठाकरे यांनी केसरकर आणि राणे कुटुंबाचा चांगलाच समाचार घेतला.
ठाकरे म्हणाले की रोज मी महाराष्ट्रभर फिरत आहे. आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. गेल्यावेळी काही गडबड झाली समजले नाही, संभ्रम निर्माण करण्यात आला, इथल्या कुठल्यातरी मैदानात टेबल टाकण्यात आली होती. मात्र, ती टेबल एका दिवसासाठी होती. मात्र, तुम्ही तुमचा आयुष्य त्यांच्या हातात दिलं असल्याचे ते म्हणाले. आपलं कोकण म्हणजे आयुष्य आहे. त्या गुंडांच्या हातात देऊ नका ते वकवक करत आहेत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर प्रहार केला.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग लोकसभेला नको त्या माणसाला निवडून दिलं, अशा शब्दात ठाकरे यांनी नारायण राणे यांना टोला लगावला. कोकण दरोडेखोराच्या हातात द्यायचं का? अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली. वैभव नाईक यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी मी धावून आलो होतो अशी आठवण त्यांनी करून दिली. आजपर्यंत भाव गद्दारांना होता. मात्र, लोकसभेत पडल्यानंतर यांना शेतकरी, लाडकी बहीण आठवल्याची टीका त्यांनी केली. ठाकरे यांनी होय मी रस्त्याने आलो आहे म्हणत राणेंना टोला लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.