'53 कोटी द्या, इतक्या जागांवर EVM हॅक करतो'
महाविकास आघाडीच्या खासदाराला ऑफर
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानाला पाच दिवस उरले आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असताना राजकीय पारा चांगलाच तापला आहे.
या सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे EVM पुन्हा एकदा चर्चेत आहे. स्वतःला व्हिसलब्लोअर म्हणवणारा एक व्यक्ती समोर आलाय. भारताच्या EVM मशीनबद्दल स्फोटक दावे करुन तो चर्चेत आहे. सैयद शुजा नावाचा हा व्यक्ती महाराष्ट्रातील नेत्यांना फोन करत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाची टेक्नोलॉजी वापरुन EVM मशीन हॅक करण्याचा तो दावा करत आहे. EVM हॅक करुन निवडणूक जिंकून देण्याच तो आमिष दाखवतोय. अमेरिकेच्या संरक्षण विभागात कॉन्ट्रॅक्टवर काम करत असल्याचा त्याचा दावा आहे.
सैयद शुजा नावाच्या या माणसाने अलीकडेच महाविकास आघाडीच्या एका ज्येष्ठ खासदाराशी संपर्क साधला. त्यानंतर या खासदाराने एका वृत्तवाहिनीच्या टीमशी संपर्क साधून त्यांना सगळा घटनाक्रम सांगितला. वृत्तवाहिनीच्या टीमने खासदाराचा खासगी मदतनीस असल्याचे भासवून शुजाशी संर्पक साधला. त्याच्या दाव्याच्या पडताळणी करण्याच्या उद्देशाने हा संपर्क साधण्यात आला. तपासामध्ये असं समजलं की, हा तोच व्यक्ती आहे, ज्याने काही वर्षांपूर्वी सरकार EVM द्वारे निवडणूक प्रभावित करत असल्याचा दावा केला होता. आता आपण स्वतः EVM मशीन हॅक करु शकतो, असं त्याचं म्हणणं आहे. 63 जागांवर EVM हॅकिंगसाठी त्याने 53 कोटी रुपयांची मागणी केली.
एका पक्षासाठी आणि EVM मशीन हॅक करण्याचा दावा शुजाने पहिल्यांदा केलेला नाही. 21 जानेवारी 2019 रोजी शुजाने लंडनमध्ये भारतीय पत्रकार संघाने आयोजित पत्रकार परिषदेत तो होता. तिथे त्याने व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अनेक स्फोटक दावे केले होते. 2009 ते 2014 दरम्यान इलेक्ट्रॉनिक कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ईसीआईएल) आणि त्यानंतर 2014 लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ईवीएम विकसित करणाऱ्या टीमचा भाग असल्याचा शुजाने दावा केला होता. ईसीआयएल आणि निवडणूक आयोगाने शुजाचे आरोप फेटाळले होते. अनेक तज्ञांनी देखील त्याचे दावे फेटाळून लावले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.