निवृत्त IPS अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची मॅट सदस्यपदी निवड
मुंबई : खरा पंचनामा
निवृत्त IPS अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाच्या (मॅट) मुंबई बँचच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. अतुलचंद्र कुलकर्णी यांची मुदत ४ वर्षे राहणार आहे.
अतुलचंद्र कुलकर्णी हे राष्ट्रीय तपास संस्थेतून नुकतेच निवृत्त झाले होते. अतुलचंद्र कुलकर्णी हे मुळचे माढा येथील राहणारे असून ते १९९० मध्ये भारतीय पोलीस सेवेत भरती झाले. त्यांनी नांदेड, जालना, जळगाव, बुलढाणा, मुंबई, भंडारा, नागपूर येथे विविध पदावर काम केले होते. केंद्रीय गुप्तचर विभागात (आयबी) ११ वर्षे सेवा दिली आहे.
त्यांनी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), कारागृह अतिरिक्त पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक येथे काम पाहिले आहे. एटीएसमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वाखाली १२८ तरुणाचे मनपरिवर्तन करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.