विधानसभेचे 288 आमदार उद्या शपथ घेणार
मुंबई : खरा पंचनामा
महायुतीचा शपथविधी सोहळा काल पार पडला असून मुंबईतील आझाद मैदानावर भव्य शपथविधी सोहळा पार पडला. महायुतीचा शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार आहे. राज्यातील 288 आमदारांना विधानसभेकडून अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले असून विधानसभेचे 288 आमदार उद्या शपथ घेणार आहेत.
भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर आज हंगामी अध्यक्ष म्हणून राजभावनात जाऊन शपथ घेणार आहे. पुढील 3 दिवस कोळंबकर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी राहणार असून कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली उद्या विशेष अधिवेशनात आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.