Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सीबीआयची 'ईडी' अधिकाऱ्याच्या घरी धाड; कोट्यवधी रुपये जप्त, बँकर भावाला अटक

सीबीआयची 'ईडी' अधिकाऱ्याच्या घरी धाड; कोट्यवधी रुपये जप्त, बँकर भावाला अटक



दिल्ली : खरा पंचनामा

सीबीआयच्या पथकाने शिमला येथील 'ईडी'च्या सहाय्यक संचालकाच्या घरी धाड टाकून कोट्यवधी रुपये जप्त केले. 'ईडी'च्या अधिकाऱयावर लाच घेतल्याचा आरोप आहे. मनी लॉण्डरिंग प्रकरणात सीबीआयने ही कारवाई करताना 1 कोटी रुपये जप्त केले.

या वेळी सीबीआयच्या पथकाला घरात रोख रक्कम आणि इतर वस्तू आढळून आल्या. धाड पडण्याआधीच 'ईडी'च्या अधिकाऱयाने घरातून पळ काढला. या प्रकरणी 'ईडी'ने संबंधित अधिकाऱयाच्या भावाला अटक केली आहे, तो पेशाने बँकर आहे.

'ईडी' अधिकाऱयाच्या शिमला येथील व्हिला या आलिशान घरी धाड टाकली असता 56 लाख रुपये रोख रक्कम सापडली. यासह एक कार जप्त करण्यात आली. धाडीनंतर आरोपी फरार झाला. या प्रकरणात आतापर्यंत 1.14 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, असे सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. फरार ईडी अधिकाऱयावर भष्टाचार निर्मूलन कायदा 1988 मधील कलम 7 अ अन्वये सीबीआयच्या चंदिगढ येथील कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'ईडी' अधिकाऱयाच्या भावाला अटक करून चंदिगड येथील विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्याला सीबीआय कोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे 'ईडी' अधिकारी ज्या दलालाच्या माध्यमातून लाच घेत होता तोदेखील फरार असून या प्रकरणात आणखी काहींच्या सहभागाची शक्यता आहे. सीबीआय या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.