शिक्षकांच्या पगारासाठी तिजोरीत नाही पैसा!
नववर्षात शिक्षकांना पगारासाठी पाहावी लागणार वाट
मुंबई : खरा पंचनामा
राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याने प्राथमिक, खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी पैसा नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील चार ते साडेचार लाख शिक्षकांना डिसेंबरच्या पगारासाठी नववर्षात काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.
शिक्षकांच्या पगारासाठी वेतन अधीक्षकांकडे प्रत्येक महिन्याच्या साधारणतः २५ तारखेपर्यंत निधी उपलब्ध झाल्यावर १ ते ५ तारखेपर्यंत पगार वितरित होतो. पण, आता २७ तारीख उजाडली तरीदेखील सरकारकडून पगारासाठी निधी मिळालेला नाही. राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील शिक्षक, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा, अनुदानित खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास साडेचार लाखांपर्यंत आहे.
शालेय शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी दरवर्षी शासनाला तिजोरीतून ६५ ते ७० हजार कोटी रुपये (दरमहा सरासरी पाच हजार ५०० कोटी) द्यावे लागतात. पण, सध्या तिजोरीची स्थिती बिकट झाली असून २०२४-२५ या आर्थिक वर्षात एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी राज्य सरकारने 'आरबीआय'ची मंजुरी घेतली आहे. त्यातील ६० हजार कोटींहून अधिक रुपयांचे कर्ज यापूर्वीच उचलले आहे. आता रखडलेले प्रकल्प, शासकीय योजनांसाठीचा निधी,' लाडक्या बहिणीं' साठी पैसे द्यायला तिजोरीत पुरेसा पैसा नाही. त्यामुळे शिक्षकांच्या पगारासाठी अजूनपर्यंत शासनाकडून अंशदान वितरित झालेले नाही.
राज्यातील शिक्षक अन् पगाराची स्थिती
• शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी
• ४.५० लाख
• दरवर्षी पगारासाठी निधी
• ६८,००० कोटी रु
• दरमहा लागणारा निधी
• ५,५०० कोटी रु
• दरमहा पगाराची तारीख
• १
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.