Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा"

"साहेब शेतमालाला भाव द्या नाहीतर लग्नासाठी मुलगी बघा"



भंडारा : खरा पंचनामा

राज्यात नवं सरकार अस्तित्वात आलं असलं तरीही काही प्रश्न अनुत्तरितच असून, आता सामान्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारत त्यांच्याकडे मदतीसाठीची विनवणी केली आहे. एकिकडे राज्यात लग्नसराईचा माहोल सुरु असतानाच दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्यामुळं एक वेगळीच परिस्थिती सर्वांसमक्ष आणण्याचा प्रयत्न या शेतकरी पुत्रानं केली आहे.

भंडारा जिल्ह्यात एका अनोख्या बॅनरची चर्चा सुरू आहे. सध्या संपूर्ण महाराष्टातील गावखेड्यांत लग्नसराई सुरू असतानाच शेतकऱ्यांकडे पाच ते दहा एकर शेती असूनसुध्दा कोणीच या शेतकऱ्यांच्या मुलाला लग्नासाठी मुलगी दाखवायला वा द्यायला तयार नाही.

यामागे असंच काहीसं कारणंही आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेत मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकरी मुलांना द्यायला तयार नाही. याच परिस्थितीला अनुसरून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत 'एक तर आमच्या शेत मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या' अशी विनंतीवजा मागणीच शेतकरी पुत्रानं केली आहे.

'ज्या दिवशी तुम्ही आम्हा शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव द्याल, त्या दिवसापासून शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सुटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याला शेती परवडते. तेव्हा लोक आपल्या. मुलीचा हात शेतकऱ्यांच्या मुलाचे हातात देईल', असं म्हणत शेतकरी कुटुंबांपुढची आव्हानं आणि समाजाचा या कुटुंबांकडे पाण्याचा दृष्टीकोन या तरुणानं प्रकाशात आणला.

आपली ही मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुलगी तरी बघून द्या', असे बॅनर भंडारा जिल्ह्यातील शेतकरी पुत्र जयपाल भांडारकरनं झळकावले. यावेळी डोक्यात टोप आणि बाशिंग बांधून त्यानं हातात फलक घेत ही बॅनरबाजी केली आणि वर्ष सरता सरता राज्यात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी लक्ष वेधलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.