Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या पोलिसावर गुन्हा सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

गुन्हा दाखल न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या पोलिसावर गुन्हा
सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

इचलकरंजीतील बांधकाम साईटवर झालेल्या अपघातप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच जखमी बालकाचा जबाब कंत्राटदाराच्या बाजूने घेण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांनी दिली.  

शेखर जयवंत पाटणकर (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तक्रारदाराने इचलकरंजी येथील एका इमारत बांधकामाचे कंत्राट घेतले आहे. दि. ७ डिसेंबर रोजी इचलकरंजीतील बांधकामाच्या ठिकाणी एक अल्पवयीन मुलगा त्याच्या नातेवाईकांना भेटायला गेला होता. त्यावेळी तेथे झालेल्या अपघातात तो मुलगा आणि त्याचे नातेवाईक जखमी झाले होते. त्यांच्यावर सांगलीतील भारती रूग्णालयात उपचार सुरू होते. या अपघातात तक्रारदाराविरोधात बालकामगार अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच त्या मुलाचा जबाब तक्रारदाराच्या बाजूने घेण्यासाठी पाटणकर याने त्यांच्याकडे २५ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदारानी याबाबत सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.  

या तक्रारीची दि. १० डिसेंबर रोजी पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत शेखर पाटणकर याने २५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून सोमवारी पाटणकर याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने निरीक्षक विनायक भिलारे, किशोर खाडे, प्रीतम चौगुले, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.