Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध

पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध



वसई : खरा पंचनामा

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या बदल्यांच्या प्रकरण चांगलेच तापू लागले आहे. या बदल्यांचे आदेश रद्द करण्यासाठी ३६ पोलिसांनी मॅट मध्ये धाव घेतली होती.

मात्र आयुक्तालयात नवीन आलेल्या ७ पोलिसांनी या याचिकेला विरोध करत मॅट मध्ये हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. बदल्यांचे आदेश रद्द करू नये अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे नवीन आलेले पोलीस आणि जुने पोलीस अधिकारी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. या प्रकरणावरी सुनावणी आता १४ जानेवारी रोजी होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने बदल्यांबाबत पोलीस महासंचालकांना निर्देश दिले होते. त्यानुसार एकाच आयुक्तालयात दोन जिल्हे असतील आणि त्यातील ज्या पोलीस अधिकाऱ्यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील अशा पोलिसांची बदली करण्यात यावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार ३० ऑक्टोबर २०२४ रोजी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलिसांच्या मुंबई पोलीस आयुक्लयाच्या हद्दीत बदल्या करण्यात आल्या होत्या.

या बदल्यांमुळे पोलिसांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) याचिका दाखल केली. बदल्याचे आदेश रद्द करून आम्हाला मूळ ठिकाणी पुन्हा पाठवावे अशी मागणी या ३६ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे. मुळात या बदल्या तात्पुरत्या होत्या. आता निवडणुका संपल्या आहेत. त्यामुळे आदेश रद्द करण्याची मागणी या याचिकेद्वार करण्यात आली आहे. त्यावर निकाल अपेक्षित असताना आता नवीन आलेल्या पोलिसांनी या बदल्यांना विरोध केला आहे. आयुक्तालयात आलेल्या ७ नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी या याचिकेत आपली भूमिका मांडण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आमचे म्हणणे ऐकून घ्या आणि बदल्यांचे आदेश रद्द करू नये अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.