Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस शिपायाची वर्दीमध्येच आत्महत्या पत्नी-सासऱ्याच्या छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

पोलीस शिपायाची वर्दीमध्येच आत्महत्या
पत्नी-सासऱ्याच्या छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल



बंगलुरू : खरा पंचनामा

बंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांनी काही दिवसांपूर्वीच (९ डिसेंबर) पत्नी आणि सासरच्या नातेवाईकांना कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर महिलांच्या बाजूने असलेल्या कायद्यांवर जोरदार टीका होऊ लागली. आता पुन्हा एकदा बंगळुरूतच एका पोलीस शिपायाने पत्नी आणि सासऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव एचसी थिपन्ना (वय ३४) असल्याचे समजते. बंगळुरूच्या हुलिमावु वाहतूक पोलीस ठाण्यात ते वरीष्ठ शिपाई म्हणून काम करत होते.

हीलालिगे रेल्वे स्थानक येथे शुक्रवारी रात्री थिपन्ना यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. थिपन्ना यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि सासऱ्यांवर आरोप केले आहेत. त्यांच्या छळाला कंटाळूनच आपण आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय घेतला, असे या चिठ्ठीत लिहिण्यात आले आहे. पत्नी आणि सासऱ्यांनी आपल्या जीविताला धोका निर्माण केला होता, असेही थिपन्ना यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.

थिपन्ना यांनी लिहिले की, १२ डिसेंबर रोजी सासरे यमुनप्पा यांनी सायंकाळी ७.२६ वाजता मला फोन केला तब्बल १४ मिनिटांच्या कॉलमध्ये त्यांनी मला धमकी दिली. तसेच दुसऱ्या दिवशी मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी माझ्या मरणाची अपेक्षा व्यक्त केली. मी मेलो तरी त्यांची मुलगी माझ्याशिवाय आनंदी राहू शकेल, असे बोलून त्यांनी माझ्याशी गैरवर्तन केले.

सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ३५१(३) आणि कलम ३५२ नुसार गुन्हा दाखल केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.