मनमोहन सिंग यांनी 'तो' निर्णय घेतला नसता तर भाजप फुटली असती !
दिल्ली : खरा पंचनामा
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92 वर्षी अखेरचा श्वास घेतला. सामान्य कुटुंबातून आलेल्या मनमोहन सिंग यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर पंतप्रधान पद मिळवले. ते हाडाचे राजकारण नव्हते. मात्र, मुल्यांवर आधारित राजकारण झाले पाहिजे म्हणून ते कायम आग्रही राहिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यातील मुल्याधिष्ठीत राजकारणी दिसून येतो.
लोकसभेत भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे अस्वस्थ होते. काँग्रेस नेत्यांशी बोलून त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश देखील निश्चित झाला होता. मुंडेंच्या पक्ष प्रवेशाची संपूर्ण तयारी देखील झाली होती. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजपचे काही आमदार देखील काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते. त्यांना या पक्षप्रवेशाविषयी काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आले.
शांत संयमी मनमोहन सिंग यांना भाजपचा उपनेता आपल्या पक्षात प्रवेश करतोय हे समजल्यानंतर त्यांनी त्याला विरोध केला. मी पंतप्रधान असताना, लोकसभेमधील भाजपच्या उपनेत्याला पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही. अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो, असे ठणकावून सांगून गोपीनाथ मुंडेंचा पक्षप्रवेश रोखला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.